जोकोविचचे जेतेपद क्रमांक 101

सर्बियाचा महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. अॅथेन्समध्ये झालेल्या हॅलािनिक चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावत त्याने आपल्या शानदार कारकीर्दीतील 101वे विजेतेपद आपल्या नावावर केले. 38 वर्षीय जोकोविचने अंतिम सामन्यात इटलीच्या लॉरेन्झो मुस्सेट्टीचा 4-6, 6-3, 7-5 असा पराभव केला. तब्बल तीन तास चाललेल्या या लढतीत दोन्ही खेळाडूंनी अप्रतिम जिद्द दाखवली. निर्णायक सेटमध्ये पाच वेळा सर्व्हिस ब्रेक झाली आणि 13 ब्रेक पॉइंट्सची लढत रंगली. या विजयानंतर जोकोविचने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला. हार्ड कोर्टवरील 72 वे विजेतेपद जिंकत त्याने रॉजर फेडररचा विक्रम मोडला आणि तो या खेळात सर्वाधिक जेतेपद जिंकणारा खेळाडू ठरला. विजयानंतर त्याने हा विजय ग्रीसच्या अद्भुत लोकांना समर्पित केला.
तसेच त्याने तुरीनमध्ये होणाऱया आगामी एटीपी फायनल्समधून दुखापतीमुळे माघार घेत असल्याचेही सांगितले.
तसेच त्याने तुरीनमध्ये होणाऱया आगामी एटीपी फायनल्समधून दुखापतीमुळे माघार घेत असल्याचेही सांगितले.

Comments are closed.