टेम्पो-ट्रकच्या भीषण अपघातात ५ ठार


निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाच्या कारण कार्यक्रम करून घरी परतत असताना छोटा टेम्पो व लोखंडी गंज घेऊन निघालेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच पुरुष ठार झाले असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि.१२) रात्री ८ वाजता व्दारका परिसरातील उड्डाणपुलावर घडली.

सिडकोतील सह्याद्री नगर येथील रहिवाशी रविवारी (दि.12) सकाळच्या सुमारास धारणगाव येथे टेम्पोने देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते. निफाडजवळ धारणगाव येथे चेतन गंभीरे यांच्या घराचे कारण होते. हा कार्यक्रम आटोपून एक महिलांचा टेम्पो आणि एक पुरुषांचा टेम्पोमधून सर्व प्रवासी घराकडे परतत होते. महिलांचा टेम्पो सुरक्षित पोहचला.
नाशिक शहारात प्रवेश केल्यानंतर द्वारका चौकाजवळ उड्डाणपुलावर लोखंडी सळ्या घेऊन वाहतूक करणार्‍या आयशर ट्रकला ( एम.एच 25 यू ०५०८) पाठीमागून छोट्या टेम्पोने (एम. एच१५ एफ.व्ही ५६०१) धडक दिली. त्यात पाच जण ठार झाले असून, सात जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले सर्व जण नाशिक शहरातील सिडको सहयाद्रीनगर येथील आहे. गंभीर जखमी झालेल्या काहींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

– Advertisement –

अशी आहेत मृतांची नावे

अतुल मंडलिक (वय २२, सर्व जण रा.सह्याद्रीनगर,सिडको), संतोष मंडलिक (५६), यश खरात, दर्शन घरटे, चेतन पवार (१७) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत.

जखमी प्रवाशी :

ओम काळे, अक्षय गुंजाळ, राहुल साबळे, अरमान खान अशी गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.



Source link

Comments are closed.