तळघरातून बाहेर पडल्या बारबाला; व्हायरल व्हिडीओवरून आदित्य ठाकरेंवर निशाणा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडीओमुळे अनेकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये बारबाला बारच्या तळघरातून बाहेर पडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अंधेरीतील एका बारमधला असल्याचे बोलले जात आहे. पण या व्हिडीओवरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आलं आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे बदनाम करण्याचा प्रयत्न असून शिवसेनेतकडून वांद्रे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. (aaditya thackeray viral video of dance bar girls come out from basement shiv sena thackeray camp complaint to cyber police)
नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये बारबाला तळघरातून बाहेर पडताना दिसत आहेत. पण या व्हायरल व्हिडीओवर आदित्य ठाकरे यांच्या नावाने मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यानुसार, हा व्हिडीओ अंधेरीतील आहे. या कॅफेचे मालक उद्धव ठाकरे यांचा मुलगा आहे. समुद्रमंथनात जितकी रत्न बाहेर पडली नसतील तेवढी रत्न या बारच्या खोदकामातून बाहेर निघाली आहेत, असे या व्हिडीओत म्हटले आहे.
– Advertisement –
या व्हायरल व्हिडीओमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. “पण या कॅफेचा आदित्य ठाकरे यांच्याशी संबंध जोडण्यात आला. परंतु, यामध्ये तथ्य नाही. आम्ही याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे”, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. खासदार विनायक राऊत यांनी वांद्रे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांना पत्र दिले आहे. काही राजकीय आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. या व्हिडीओची चौकशी करावी आणि कारवाई करावी अशी मागणी, असे विनायक राऊत यांनी सायबर पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
“हा बार आदित्य ठाकरे यांच्या मालकीचा असल्याचा खोटा प्रचार करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची बदनामी केली जात आहे. यामध्ये विकृत मनोवृत्तीची सत्ताधारी राजकारणी आहेत. त्यांची टोळी यामध्ये कार्यरत आहे. जी या प्रकारची बदनामी करत आहे. सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिसांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केले आहे. तसेच, तातडीने आम्ही कारवाई करू असे पोलिसांनी सांगितले”, असेही विनायक राऊत म्हणाले.
– Advertisement –
व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला?
मुंबई पोलिसांनी 13 डिसेंबर 2021 ला मुंबईतील अंधेरी येथील दीपा बारमध्ये छापा टाकला होता. त्या बारमधील गोपनीय तळमजल्यावरुन 17 महिलांची सुटका करण्यात आली होती. त्यासंदर्भातील बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या कारवाईचा व्हिडीओ आता कथित दावाकरुन शेअर केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा – Vijay Wadettiwar : विधानसभेतील पराभवाचे कवित्व! वडेट्टीवारांनी मविआच्या या दोन नेत्यांवर ठेवला ठपका
Comments are closed.