थोडक्यात बातम्या – डी. वाय. पाटील यांची श्रद्धांजली सभा
मुंबई : शिक्षणतज्ञ, समाजसेवक डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, सेंटर ऑफ एक्सलन्स येथे ही सभा पार पडणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: दिलीप कवडे ९९३०१५००००, रोहित म्हसकर ८०८२०५००००,
हिंदुस्थानी नौदलात ‘आयएनएस मालवण’
चेन्नई: आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडियाने कारवार, कर्नाटक येथे हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात सामील झालेल्या ‘आयएनएस मालवण’ या नवीन स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीविरोधी युद्धनौकेच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या १०० टक्के विशेष स्टीलचा पुरवठा केला. हझिरा येथे तयार झालेले हे स्टील भारताच्या वाढत्या संरक्षण उत्पादन व्यवस्थेला बळ देते. कोचिन शिपयार्ड लिमिटेडने बनवलेली ‘आयएनएस मालवण’ ही आठ माहे-क्लास एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसीएस युद्धनौकांपैकी दुसरी आणि भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणारी या वर्गातील दुसरी युद्धनौका आहे.
डॉ. संदीप सावळकर यांना विधी विषयात पीएच. डी.
मुंबई : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईने डॉ. संदीप सावळकर यांना विधी विषयातील पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार करारांमधील आरक्षणविषयक तरतुदींची अंमलबजावणी आणि हिंदुस्थानातील त्याचे परिणाम’ या विषयावरील संशोधन डॉ. प्रतापसिंह साळुंखे, विशेष कार्य अधिकारी, एमएनएलयूचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप उके, सहयोगी अधिष्ठाता व सहयोगी प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. या संशोधनात हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार करारांना मान्यता देताना नोंदविलेल्या आरक्षणात्मक अटींचा घटनात्मक, कायदेशीर आणि व्यावहारिक परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून सार्वजनिक धोरण, न्यायालयीन व्याख्या, विधी सुधारणा याबाबत शिफारशी करण्यात आल्या आहेत.
Comments are closed.