Breakfast : नाश्त्यात चुकूनही खाऊ नयेत हे पदार्थ
तज्ज्ञांच्या मते, दिवसाची सुरूवात हेल्दी पदार्थांनी करावी. हेल्दी पदार्थांतील पोषक घटक आपल्याला दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक ठेवतात. काहीजण नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, सॅंडविच, ब्रेड, बिस्किट्स खातात आणि हे पदार्थ खाल्ल्यावर चहा किंवा कॉफी सुद्धा घेण्यात येते. पण, तुम्हाला माहीत आहे का? तज्ज्ञांच्या मते, नाश्त्यात काही पदार्थ खाऊ नयेत,असे सांगितले जाते, कारण या पदार्थांमुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्याऐवजी ऍसिडिटी, जळजळ अशा तक्रारी सुरू होतात. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात नाश्त्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत.
कॉफी किंवा चहासोबत बिस्किट –
कॉफी किंवा चहासोबत बिस्किट्स खाल्ल्याने शरीराला कोणतेही पोषक घटक मिळत नाही. उलट गोड जास्त खायची इच्छा होते. ज्यामुळे तुमचं वजन वाढू शकते. त्यामुळे सकाळी चहा किंवा कॉफी तुमचा पोटभरून नाश्त्यानंतर घ्यावी आणि बिस्किटांऐवजी मूठभर ड्रायफुट्स, अंडी खायला हवेत.
सॅंडविच –
रिफाइंड ब्रेड सकाळच्या नाश्त्यात खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते. अशा परिस्थितीत तुम्ही प्रोटिन्ससाठी ब्राउन ब्रेड, अंडी, भाज्या यापांसून तयार करण्यात सॅंडविच खायला हवा.
उपमा किंवा पोहे –
तज्ज्ञांच्या मते, पोहे किंवा उपमा यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागते. अशावेळी तुम्ही पोहे आणि उपमा यात फायबरयुक्त भाज्यांचा समावेश करायला हवा.
फळांचा ज्यूस आणि टोस्ट –
फळांचा ज्यूस आणि टोस्ट या कॉम्बिनेशनमध्ये प्रोटिन आणि फायबर नसतात, उलट साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. अशा वेळी फळांचा ज्यूस न पिता पूर्ण फळ खायला हवे. फळातील पोषक घटक शरीराला मिळतील.
स्वादयुक्त इन्सॉन्ट ओट्स –
फ्लेवर्ड इन्संट ओट्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि प्रोटिन, फायबर कमी असते. ज्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा वाढते आणि वजन वाढू लागते.
सकाळच्या नाश्त्यात काय खाल ?
दिवसभर फ्रेश राहण्यासाठी सकाळचा नाश्ता महत्त्वाचा असतो. त्यामुळे शरीराला उर्जा मिळण्यासाठी नाश्त्यात फळांचा समावेश करणे उपयुक्त असते. तुम्ही फळांसोबत ग्रीक दही, उकडलेले अंडे सुद्धा खाऊ शकता.
हेही पाहा –
Comments are closed.