मच्छीमारांनाही कर्जमाफी हवी; विविध संघटनांची सरकारकडे मागणी
शेतकऱ्यांच्या धर्तीवर मच्छीमारांचीही कर्जमाफी करावी, अशी आग्रही मागणी विविध मच्छीमार संघटनांनी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे. रत्नागिरी जिह्यातील गुहागर तालुक्यातील वेलदूर मच्छीमार व्यावसायिक संस्था व संघटनांनी सरकारला पत्र लिहून आपली व्यथा मांडली. त्यात इंधनाचे वाढलेले बेसुमार दर, मासेमारी हंगामात सातत्याने होणारी वादळे, आखाती देशांमधील युद्ध अशा अनेक कारणांमुळे मच्छीमार मेटाकुटीला येऊन कर्जबाजारी झाल्याचे संघटनांनी सरकारला निवेदनात म्हटले आहे.
Comments are closed.