माजी अधिकारी आयोगाचे समर्थन करतात.

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या समर्थनार्थ आणखी माजी अधिकारी समोर येत असल्याचे दिसून येत आहे. 124 माजी सनदी अधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे ज्ञानेश कुमार यांचे समर्थन केले असून भारतात एसआयआर प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या माजी अधिकाऱ्यांनी जनतेला उद्देशून एक मुक्त पत्र प्रसिद्ध केले असून, देशात अराजक माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींपासून जनतेने सावध रहावे, असे आवाहन या पत्रात त्यांनी केले आहे. देशातील निवडणुकांमध्ये घोटाळा केला जात आहे, असा आरोप होत असला, तरी तो पुराव्याच्या आधारे सिद्ध होण्याची आवश्यकता असते. केवळ कोणीतरी आरोप केला म्हणून तेच सत्य आहे, असे समजणे देशासाठी धोकादायक आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मात्र, देशात ज्या निवडणुका झाल्या, तर बेकायदेशीर आहेत, असा आरोप प्रछन्नपणे केला जात आहे. असा आरोप करणाऱ्यांनी त्याचे पुरावे द्यावयास हवेत. ते पुरावे न दिल्यास त्यांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित होऊन करण्यात आले आहेत, असा अर्थ होईल, असा इशारा या पत्रात या माजी अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे दिलेला आहे.

 

Comments are closed.