मुंबई सडे मार्गे मंडणगड एस.टी. बस ला शेनाळेत अपघात बसमधील 18 प्रवासी बालंबाल बचावले
राजेवाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट स्थितीतील कामामुळे मंडणगडात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस कमालीची वाढ होत चालली आहे. अशाच प्रकारची अपघाताची घटना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता शेनाळे हद्दित घडली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणाही प्रवाशांना दुखापत झाली नाही.
मुंबई सेंट्रल येथून रात्री 12 वाजता मंडणगड येथे येण्यासाठी प्रवाशांना घेऊन निघालेली नियमित मुंबई सडे मार्गे मंडणगड ही एस.टी. बस शेनाळे येथे पहाटे 5.30 वाजता आली असता एस.टी. बस रस्ता सोडून दरीकडील बाजूस कलंडल्याने अपघात घडला. मात्र एस. टी. बस मधील प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या सुदैवाने बस मधील सर्व प्रवासी थोड बचावले .
मुंबई सडे मार्गे मंडणगड येथे येण्यासाठी नेहमी प्रमाणे प्रवासी घेऊन मुंबई सेंट्रल येथून रात्री 12 वाजता मुंबई सडे मार्गे मंडणगड येथे येण्यासाठी सुटलेली एस.टी .बस ही मंगळवारी 2 जून रोजी पहाटे सडे गावाच्या आधी असलेल्या शेनाळे गावाच्या हद्दीत बस आली असता. मुंबई आगाराची बस रस्ता सोडून दरीकडील भागाकडे कलंडली या झालेल्या दूर्देवी अपघातात एस.टी.बसमधून प्रवास करणारे सर्वच्या सर्व 18 प्रवासी सुखरूप बचावले. या झाल्या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच तत्काळ शिरगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि शेनाळे गावाचे विश्वनाथ सावंत यांच्यासह सुनील साळवी , विकी कदम ,विवेक वाडकर आदींसह शेनाळे येथील स्थानिक ग्रामस्थांनी प्रवाशांना मदतीचा हात देत पुढील त्यांच्या इप्सित जाण्याच्या ठिकाणी प्रवासासाठी रिक्षा उपलब्ध करून देत प्रवास सोपा करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील मूळ गावी आंबडवे येथे जाण्यासाठी राजेवाडी ते आंबडवे या नव्याने तयार करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामामुळे अपघाताचे प्रमाण खूपच वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील 8 वर्षांपासून सुरू आहे . महामार्गाच्या कामासाठी ठिक ठिकाणी खडी , वाळू आदी साहित्य रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेले आहे. मात्र ठेवण्यात आलेले ते खडी सदृष्य साहित्य सगळीकडे पसरत चालल्याने खडी आणि रेती रात्रीच्या अंधारातील अंधुक प्रकाशात वाहन चालकांना धड दिसत नाही. त्यामुळे इतस्ततः रस्त्यावर पडलेल्या खडी रेती मुळेच सदरचा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.
Comments are closed.