शाकिब अल हसनच्या घरावर फेकले पेट्रोल बॉम्ब
बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाकिब अल हसन याच्या मागुरा शहरातील घरावर अज्ञात निदर्शकांनी पेट्रोल बॉम्ब फेपून हल्ला केला. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या नवी दिल्लीतून एका पत्रकार परिषदेत व्हर्च्युअली सहभागी झाल्या होत्या. त्यात शाकिब अल हसन उपस्थित राहिला होता. त्यानंतर काही तासांनी ही घटना घडली. हल्लेखोरांनी शाकिब हसनचे घर पेटवण्याचाही प्रयत्न केला.
शेख हसीना बुधवारी दोन वर्षांनी एका कार्यक्रमात व्हर्च्युअली उपस्थित झाल्या. या कार्यक्रमात सहभागी झाल्यावरून बांगलादेशातील कट्टरपंथीयांनी त्याच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या कार्यक्रमानंतर काही तासांनी त्याच्या घरावर हल्ला झाला. हल्ला झाला त्यावेळी घरात कोणीही नव्हते.
Comments are closed.