हर्षित राणानंं रचला इतिहास, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू

भारतीय संघाने पुणेमध्ये झालेल्या चाैथ्या टी20 सामन्यात इंग्लंड संघाचा 15 धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य दिले. त्यानंतर इंग्लंडचा संघ फक्त 166 धावांवर ऑलआउट झाला. या सामन्यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या हर्षित राणाने शानदार कामगिरी करत तीन विकेट्स घेतल्या.

सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. इंग्लंडकडून साकिब महमूदने दुसरे षटक टाकले आणि या षटकात एकूण तीन विकेट पडल्या. यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. यानंतर अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग यांनी काही वेळ विकेटवर राहण्याचा प्रयत्न केला. परंतु ते देखील मोठी खेळी खेळू शकले नाहीत. यानंतर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने अर्धशतके झळकावली. दोन्ही खेळाडूंनी 53-53 धावांच्या खेळी खेळल्या. या दोघांमुळे भारतीय संघ 181 धावांपर्यंत पोहोचू शकला. दुबेने त्याच्या डावात 7 चौकार आणि 2 षटकार मारले. पण सामन्याच्या शेवटच्या षटकात दुबेच्या हेल्मेटला चेंडू लागला.

यानंतर, शिवम दुबेच्या जागी, वेगवान गोलंदाज हर्षित राणाला दुखापतीमुळे पर्यायी खेळाडू म्हणून भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले. यासह त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून टी20 मध्ये पदार्पण करणारा पहिला भारतीय ठरला.

अलिकडेच झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणारा हर्षित राणा 12 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला. ज्यामध्ये त्याने झटपट प्रभाव पाडला. त्याने लियाम लिव्हिंगस्टोनला नऊ धावांवर बाद केले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर या निर्णयावर नाराजी दर्शवली. आयसीसीच्या नियमांनुसार, कन्कशन सबस्टिट्यूट (डोक्याला चेंडू लागल्यास) झाल्यास अशाच प्रकारचा पर्यायी खेळाडू खेळवण्याची परवानगी आहे. यामध्ये विरोधी संघालाही आपली संमती द्यावी लागते. राणाने त्याच्या पहिल्याच टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शानदार कामगिरी केली. त्याने सामन्यात चार षटकांत 33 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. ज्यात त्याने लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल आणि जेमी ओव्हरटन यांचे बळी घेतले.

हेही वाचा-

IND vs ENG; पुण्यात भारतानं इंग्लंडला लोळवलं, पांड्या-दुबेची झंझावती खेळी, मालिका खिश्यात..!
संघाला मोठा धक्का! अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्ती
IND vs ENG: पुणे टी20 सामन्यासाठी MCA स्टेडियम सज्ज! सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट

Comments are closed.