Pahalgam Attack- और कितना गिरोगे.. शिखर धवनने काढली शाहिद अफ्रिदीची इज्जत.. एक्सवर पोस्ट करत घेतला खरपूस समाचार
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात संतापाची लाट आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे यात शंका नाही, परंतु येथील माजी क्रिकेटपटू हे मान्य करायला तयार नाहीत. शाहिद आफ्रिदीसारखे माजी खेळाडू पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याबद्दल हिंदुस्थानकडून पुरावे मागत आहेत.
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शिखर धवनने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीवर टीका केली आहे. शिखर धवनने त्याच्या एक्स हँडलवरून ट्विट केले की, शाहिद आफ्रिदी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पुरावे मागत आहे. अजून किती खालच्या पातळीला जाणार असं म्हणत शिखरने शाहिद अफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतलेला आहे.
शिखर धवनने त्याच्या एक्स-हँडलवर ट्विट केले की, ‘आम्ही तुम्हाला कारगिल युद्धातही हरवले आहे, तुम्ही आधीच इतके खालच्या पातळीचे आहात.. अजून किती खालच्या पातळीवर उतरणार?’ असा प्रश्न शिखर धवनने उपस्थित करत पोस्ट केली आहे.
कारगिल मीन भी हराया था, अल्रूडी इटना गिरे ह्यू ह्यू हू ऑर किटना गिरगे, बेवाजा टिप्पण्या पास कार्ने से आचा है अप्ने देश की ताराकी माई दिमाग लागोओ @Safidifficialह्यूमिन हमरी इंडियन आर्मी पॅर बोहोट गारव है. भारत माता की जय! जय हिंद!https://t.co/5pva34cnse
– शिखर धवन (@sdhawan25) 28 एप्रिल, 2025
शाहिद आफ्रिदी वायफळ बडबड करण्यापेक्षा, तुमच्या देशाच्या प्रगतीकडे लक्ष द्या. आम्हाला आमच्या हिंदुस्थानी सैन्याचा खूप अभिमान आहे. जय हिंद
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया आली. या पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी आफ्रिदीने भारतीय सैन्याला जबाबदार धरले आहे. त्यांनी पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे मागितले आणि घटनेच्या मीडिया कव्हरेजवर टीका केली. एवढेच नाही तर, कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तानवर आरोप करणाऱ्या काही माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनाही आफ्रिदीने लक्ष्य केले होते.
शाहिद आफ्रिदीने सामा टीव्हीवर बोलताना, हिंदुस्थानी सैन्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले होते. शाहिद आफ्रिदीने हिंदुस्थानविरुद्ध विष ओकण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. आफ्रिदीला संधी मिळते तेव्हा तो हिंदुस्थानविरोधी विधाने कायम करत असतो.
Comments are closed.