IPL 2025 – मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला लॉटरी लागली, ‘या’ संघाकडून उतरणार मैदानात

आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू होण्यासाठी आता काही तास शिल्लक आहे. तोडफोड फटकेबाजी आणि गोलंदाजांचा आक्रमक पवित्रा पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत. अशातच मुंबईचा स्टार गोलंदाज शार्दुल ठाकूरला लॉटरी लागली आहे. दुबईच्या जेद्दाहमध्ये पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत शार्दुल ठाकूरला कोणत्याच संघाने खरेदी केले नव्हते. परंतु आता शार्दुल ठाकूर आयपीएलमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे.
आयपीएलची फटकेबाजी 22 मार्च पासून सुरू होणार आहे. पहिला सामना गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ऐतिहासिक इडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. त्यामुळे या दोन संघांसह सर्वच संघ विजयाची पताका फडकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच ऋषभ पंतच्या लखनऊ सुपर जायंट्स शार्दुल ठाकूला आपल्या ताफ्यात घेण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूर हा फक्त गोलंदाज नाही तर वेळ पडल्यास फटकेबाजी करण्याची सुद्धा त्याच्यामध्ये क्षमता आहे. गेल्या काही दिवसांपासून शार्दुल ठाकूर लखनऊ सुपरजायंट्स सोबत सराव करत आहे. मोहसिन खानच्या जागेवर शार्दुल ठाकूरची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे मोहसिन खान या हंगामातून बाहेर झाला आहे. या संदर्भात लखनऊने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु दिल्लीविरुद्ध होणाऱ्या लखनऊच्या पहिल्या सामन्यात शार्दुल सुद्धा संघासोबत विशाखापट्टनमला जाणार आहे.
Comments are closed.