11 विकेट तरीही संघाबाहेर कसा? गांगुलीचा रोखठोक सवाल

हिंदुस्थान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने मुख्य निवडकर्ता अजित आगरकरवर थेट निशाणा साधत मोहम्मद शमीच्या निवडीवर खळबळजनक प्रश्न उपस्थित केला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करताना 11 विकेट काढूनही शमीला संघाबाहेर ठेवण्यात येत असल्याने गांगुलीने थेट विचारले, शमी हिंदुस्थानसाठी का खेळू शकत नाही?
सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत बंगालकडून खेळताना शमीने आपला तोच जुना दरारा दाखवत मागील तीन सामन्यांत 11 विकेट टिपले आणि आपण आजही संघासाठी सज्ज आहोत, हे ठामपणे सांगितले. त्याआधी रणजी ट्रॉफीतही शमीची कामगिरी लक्षवेधी ठरली होती.

Comments are closed.