मुंबईला महाराष्ट्र आणि मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा राजकारणात खात्मा केल्या शिवाय राहणार नाही, शपथ घेऊन एकत्र आलो आहोत! – उद्धव ठाकरे

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचे दोन वाघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणार हे निश्चित झालेच होते, फक्त आता अधिकृत घोषणा बाकी होती. घोषणा ऐकण्यासाठी मराठीजनांने कान आसुसलेले होते. अखेर ती वेळ आलीच. 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार अशी घोषणा केली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत हे देखील यावेळी मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी’, या वाक्याची आठवण करून दिली. ‘यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणीही वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबई महाराष्ट्रापासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्या शिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत’, असा खणखणीत इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे. मुंबईत एकत्र पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना-मनसेची युती जाहीर केली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. मराठी माणसांनो आता फुटाल तर पूर्णपणे संपून जाल; तुटू नका फुटू नका मराठीचा वसा टाकू नका, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठीजनांना केले.
विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता बटेंगे तो कटेंगे… तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल. आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपूल जाल. म्हणून तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हाच एक संदेश आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे. मला खात्री आहे की, मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही पण त्याच्या वाटेला जर कोणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावले.
मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत – संजय राऊत

Comments are closed.