0 डॉट बॉल, अभिषेक शर्माने केला अनोखा विश्वविक्रम, असा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला
अभिषेकने 20 चेंडूत 340 च्या स्ट्राईक रेटने 68 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यात त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले. आपल्या डावात त्याने केवळ चौकारांद्वारे 58 धावा केल्या.
अभिषेकने आपल्या डावात 12 चेंडूंवर चौकार लगावले आणि उर्वरित धावा धावत पूर्ण केल्या. त्याने आपल्या डावात एकही डॉट बॉल खेळला नाही. एकही डॉट बॉल न खेळता पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याचवेळी, अभिषेकची २० चेंडूंची खेळी ही एकही डॉट बॉल न खेळता संयुक्त सर्वात मोठी खेळी आहे.
Comments are closed.