नेपाळच्या बालेंद्र शाह यांच्याकडे 1.4 कोटींची रोख

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भ्रष्टाचारविरोधी प्रतिमा आणि सामान्य जनतेचा नेता म्हणून सत्तेवर आलेल्या पंतप्रधान बालेंद्र शाह आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आपली संपत्ती जाहीर केल्याने अवघ्या नेपाळच्या भुवया उंचावल्या आहेत. शाह यांच्याकडे तब्बल 1.4 कोटी रोख रक्कम असून 190 तोळे सोने आहे. नेपाळच्या कायद्यानुसार, मंत्रीपद मिळाल्यानंतर साठ दिवसांच्या आत संपत्ती जाहीर करणे बंधनकारक आहे. बालेन शाह यांनी ही माहिती महिनाभरातच सार्वजनिक करत पारदर्शकतेचा प्रयत्न केला. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या जमीन, सोने, शेअर्स आणि बँक बॅलन्सची आकडेवारी सार्वजनिक झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

Comments are closed.