बिहारमध्ये बस अपघातात 10 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था / पाटणा
प्रवासी बस आणि एक पिक अप व्हॅन एकमेकींवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान 10 प्रवासी मृत झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना बिहार राज्याच्या कटिहार जिल्ह्यात कोरहा पोलीस स्थानकाच्या कार्यकक्षेतील गेराबारी या खेड्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी घडली, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. दोन्ही वाहने समोरासमोर एकमेकांवर आदळल्याने दोन्ही वाहनांची मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेत किमान 25 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अपघातानंतर काहीकाळ या महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती. तथापि, ती त्वरित पुन्हा कार्यरत करण्यात प्रशासनाला यश आले, अशी माहिती दिली गेली.
Comments are closed.