S-400 क्षेपणास्त्रांसाठी 10 हजार कोटींचा करार
भारत रशियाकडून खरेदी करणार शस्त्रास्त्रे
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत रशियाकडून एस-400 हवाई संरक्षण प्रणालीसाठी मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची तयारी करत आहे. हा करार सुमारे 10,000 कोटी रुपयांचा असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या कराराबाबत भारत आणि रशियामध्ये सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या अंतिम टप्प्यात आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक 23 ऑक्टोबर रोजी होणार असून यावेळी सदर प्रस्तावावर चर्चा होऊ शकते.
हवाई दलाला त्यांची हवाई संरक्षण क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी ही क्षेपणास्त्रs खरेदी करायची आहेत. भारतीय हवाई दलाच्या एस-400 प्रणालीने पाकिस्तानविरुद्धच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेवेळी स्वत:ला सिद्ध केले होते. चार दिवसांच्या संघर्षादरम्यान, या प्रणालीने 300 किलोमीटर अंतरावरून पाच ते सहा पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक गुप्तचर विमान पाडले होते. हवाई दलाने या प्रणालीला गेम-चेंजर म्हणून उल्लेखले होते.
Comments are closed.