10 विकेट आणि शतक… कसोटी क्रिकेटच्या 150 वर्षांच्या इतिहासात फक्त 3 खेळाडूंनाच जमला हा पराक्रम
कसोटी क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी आपल्या अफलातून खेळामुळे अनेक मोठमोठी विक्रमं घडवून आणली आहेत. कुणी एका डावात 10 विकेट्स घेतल्या आहेत, तर कुणी एका डावात 400 धावांची भव्य खेळी केली आहे. या फॉरमॅटमध्ये सलग 5 दिवस संयम, चिकाटी आणि कौशल्य दाखवावं लागतं. एका डावात 10 विकेट्स घेण्याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल, पण आज आपण अशा 3 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी कसोटी सामन्यात शतक ठोकण्याबरोबरच 10 विकेट्स घेण्याचंही महारिकॉर्ड आपल्या नावावर केलं आहे.
इयान बॉथम- इंग्लंडचा महान ऑलराऊंडर इयान बॉथम हा असा पराक्रम करणारा पहिला खेळाडू ठरला. 1980 साली एका कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या. त्यानंतर बॉथमने 114 धावांची खेळी केली आणि अशा प्रकारे एका सामन्यात शतक + 10 विकेट्स घेणारा पहिला खेळाडू बनला.
इमरान खान- पाकिस्तानचा दिग्गज ऑलराऊंडर इमरान खान याने 1983 साली भारताविरुद्ध हा पराक्रम केला. पहिल्या डावात त्याने 6 विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या. यानंतर त्याने 117 धावांची शानदार खेळी केली आणि हा अद्वितीय विक्रम आपल्या नावावर केला.
शाकिब अल हसन- बांगलादेशचा धडाकेबाज ऑलराऊंडर शाकिब अल हसन याने 2014 साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना हा ऐतिहासिक विक्रम केला. या सामन्यात त्याने पहिल्या व दुसऱ्या दोन्ही डावांत 5-5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 137 धावांची खेळी करून शतकही ठोकले. अशा प्रकारे तो जगातील तिसरा खेळाडू ठरला ज्याने एका सामन्यात शतकासह 10 विकेट्स घेतल्या.
Comments are closed.