Keyboard Customization : स्मार्टफोनचा बोअरिंग कीबोर्ड करा स्टायलिश!
दिवसभरात आपण सर्वाधिक वापरत असलेली गोष्ट म्हणजे स्मार्टफोनचा कीबोर्ड. मेसेजिंग, सोशल मीडिया, ई-मेल किंवा ऑफिसचे काम प्रत्येक ठिकाणी कीबोर्डचा वापर होतो. मात्र अनेकजण वर्षानुवर्षे एकाच साध्या कीबोर्डचा वापर करतात. तुम्हालाही फोनचा कीबोर्ड कंटाळवाणा वाटत असेल, तर काही सोप्या सेटिंग्ज बदलून त्याला आकर्षक आणि स्टायलिश लूक देता येतो. त्याचबरोबर टायपिंगचाही अनुभव अधिक आरामदायी होतो. Smartphone Keyboard Theme
कीबोर्डची थीम कशी बदलाल?
– सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये कोणतेही चॅट किंवा नोट्स अॅप उघडून कीबोर्ड ओपन करा.
– आता कीबोर्डवरील Settings आयकॉनवर टॅप करा.
– त्यानंतर Theme किंवा थीम हा पर्याय निवडा.
– येथे तुम्हाला विविध थीम्स दिसतील.
जसं की लाईट थीम, डार्क थीम, लाईट ग्रेडियंट, डार्क ग्रेडियंट, सॉलिड कलर्स, निसर्ग, पर्वत, समुद्र, फुले अशा लँडस्केप थीम निवडल्यानंतर स्क्रीनच्या खाली दिसणाऱ्या Apply किंवा लागू करा या पर्यायावर क्लिक करा. काही क्षणांत तुमच्या कीबोर्डचा संपूर्ण लूक बदललेला दिसेल.
स्वतःचा फोटो कीबोर्डची Background
काही कीबोर्ड अॅप्समध्ये Custom Background किंवा My Theme असा पर्याय असतो. याच्या मदतीने तुम्ही स्वतःचा फोटो, आवडता वॉलपेपर, निसर्गचित्र पाळीव प्राण्याचा फोटो कीबोर्डच्या बॅकग्राऊंड म्हणून वापरू शकता.
कीबोर्डचा आकार बदला
मोठा किंवा लहान कीबोर्ड हवा असल्यास Resize Keyboard किंवा Keyboard Height पर्याय वापरा. मोठ्या स्क्रीनच्या फोनमध्ये हा पर्याय विशेष उपयुक्त ठरतो.
डार्क मोड वापरा
रात्री फोन वापरत असाल तर डार्क थीम निवडा. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि AMOLED डिस्प्ले असलेल्या फोनमध्ये बॅटरीचीही बचत होऊ शकते.
फक्त काही मिनिटांत स्मार्टफोनचा साधासुधा कीबोर्ड पूर्णपणे स्टायलिश आणि वैयक्तिक आवडीनुसार बदलता येतो. रंग, थीम, बॅकग्राऊंड, कीबोर्डचा आकार आणि इतर स्मार्ट फीचर्स वापरून तुम्ही टायपिंगचा अनुभव अधिक आकर्षक आणि सोयीस्कर बनवू शकता. जर तुम्ही अजूनही फोनचा डिफॉल्ट कीबोर्ड वापरत असाल, तर हे सोपे बदल करून एकदा नक्की पाहा.
Comments are closed.