कडधान्ये की पालेभाज्या, पावसाळ्यात आरोग्यासाठी योग्य काय?
पावासाची जोरदार बॅटिंग सुरू असून सर्वत्र आल्हाददायक वातावरण सुरू आहे. परंतू पावसाळ्याचा ऋतू जितका आल्हाददायक असतो, तितकाच तो आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक मानला जातो. या दिवसांत हवामानातील दमटपणा मुळे पचनसंस्था मंदावते आणि विविध संसर्गाचा धोका वाढतो. अशा वेळी रोजच्या आहारात पालेभाज्या खाव्यात की कडधान्ये? असा प्रश्न अनेकांना पडतो. आरोग्यतज्ज्ञांच्या मते कडधान्ये की पालेभाज्या, पावसाळ्यात शरीरासाठी काय योग्य हे जाणून घेऊयात. monsoon best vegetables
पालेभाज्या खाणे किती सुरक्षित?
पावसाळ्यात पालक, मेथी, लाल माठ यांसारख्या पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरिया, बुरशी आणि कीटकांची अंडी साचण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे शक्यतो टाळावे. यासह दमट वातावरणामुळे या दिवसात पालेभाज्या लवकर खराब होतात.
तज्ज्ञ यावर काय सांगतात?
- पावसाळ्यात कच्च्या किंवा अर्धवट शिजवलेल्या पालेभाज्या खाणे टाळावे.
- जर पालेभाज्या खायच्या असतील तर त्या कोमट मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, योग्य प्रकारे शिजवूनच खाव्यात.
कडधान्ये खाणे किती सुरक्षित?
पावसाळ्यात पालेभाज्यांच्या तुलनेत कडधान्ये जसे की मूग, मटकी, हरभरा, मसूर अधिक सुरक्षित मानली जातात.
कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
काळजी काय घ्याल?
पावसाळ्यात पचनशक्ती मंद असल्यामुळे कडधान्ये नीट भिजवून, मोड आणून आणि व्यवस्थित शिजवून खावीत.
कच्ची मोड आलेली कडधान्ये खाणे टाळावे, कारण यामुळे पोटाचे आरोग्य बिघडू शकते.
शरीरासाठी योग्य काय?
थोडक्यात सांगायचे तर पावसाळ्यात कच्च्या पालेभाज्यांपेक्षा चांगल्या प्रकारे शिजवलेली कडधान्ये आणि वेलीवरील भाज्या आरोग्यासाठी अधिक योग्य आणि सुरक्षित पर्याय आहेत.
हेही वाचा – चहासोबत कोणते बिस्किट खावे, गोड की खारट?
Comments are closed.