गोदावरीने वाढवले नाशिककरांचे टेन्शन; टॉप 7 फोटोतून पाहा गंभीर परिस्थिती
नाशिक : नाशिक जिल्ह्याला आज (23 जुलै) हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार, आज नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीने यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच रौद्ररूप धारण केले. धरणातून केलेला विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रातील सततच्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत असून रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे, घाट आणि रामसेतू पूल पाण्याखाली गेले आहेत. प्रसिद्ध दुतोंड्या मारुती मंदिराच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचल्याने नदीकाठच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते, हे लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Comments are closed.