सीम इजेक्टर पिन फक्त सीम काढण्यासाठी नाही, या कामांसाठीही ठरते उपयुक्त

नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर बॉक्स उघडताच आपल्याला मोबाईल, चार्जर, केबलसोबत एक लहानशी धातूची टाचणीसारखी पिन दिसते, ज्याला सीम इजेक्टर पिन म्हटले जाते. बहुतांश लोक या पिनचा वापर फक्त सीम कार्ड किंवा मेमरी कार्ड ट्रे बाहेर काढण्यासाठीच करतात, नाहीतर हे पिन कुठेतरी बॉक्समध्ये पडून राहते किंवा हरवून जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, की ही इजेक्टर पिन अनेक ठिकाणी उपयुक्त पडू शकते. sim ejector pin uses in marathi

सीम कार्ड काढण्यासाठी सेफ्टी पिन, टाचणीचा वापर केला जातो. मात्र, यामुळे मोबाईलच्या सीम ट्रेच्या सेन्सरला हानी पोहोचू शकते. इजेक्टर पिनची रचना मोबाईलच्या अंतर्गत भागाला नुकसान न पोहोचवता ट्रे सहज बाहेर काढण्यासाठी विशेष रीतीने केलेली असते. त्यामुळे त्याचाच वापर करावा.

अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये जसे की वाय-फाय राउटर, ब्लूटूथ स्पीकर्स, स्मार्टवॉच किंवा लहान गॅजेट्समध्ये रीसेट करण्यासाठी एक अगदी बारीक छिद्र दिलेले असते. हे लहान बटन बोटाने दाबणे शक्य नसते. अशा वेळी सीम इजेक्टर पिन वापरता येईल.

मोबाईलच्या स्पीकरच्या जाळीमध्ये अनेकदा धूळ साचते. अशावेळी तुम्ही हलक्या हाताने इजेक्टर पिनचा वापर करून ही साचलेली धूळ साफ करू शकता.

काही प्रसंगी लहान वस्तू लॉक-अनलॉक करण्यासाठी, लहान बटनांची सेटिंग बदलण्यासाठी हे टूल उपयोगी पडू शकते.

थोडक्यात सांगायचे तर स्मार्टफोनसोबत येणारी ही सीम इजेक्टर पिन दिसायला छोटी असली तरी तुमच्या गॅजेट्सच्या सुरक्षिततेसाठी आणि इतर कामांसाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

हेही वाचा – पावसाळ्यात मुलांना कोणते कपडे घालावेत?

Comments are closed.