आठवडाभराचं फूड प्लॅनिंग सोपं करणारा नवा ट्रेंड ‘फ्रिज रीस्टॉक मेथड’




आठवडाभराचं फूड प्लॅनिंग सोपं करणारा नवा ट्रेंड ‘फ्रिज रीस्टॉक मेथड’


व्यस्त जीवनशैलीमुळे रोज “आज काय बनवायचं?” हा प्रश्न अनेक गृहिणी आणि नोकरदार महिलांसमोर उभा राहतो. ऑफिस, मुलांची शाळा आणि घरातील इतर जबाबदाऱ्यांमुळे दररोज स्वयंपाकाचं नियोजन करणं कठीण जातं. अशा वेळी सोशल मीडियावर आणि होम ऑर्गनायझेशन एक्सपर्ट्समध्ये ‘फ्रिज रीस्टॉक मेथड’ ‘Fridge Restock Method’ हा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे. या पद्धतीमुळे आठवडाभराचं फूड प्लॅनिंग सोपं होतं, अन्नाची नासाडी कमी होते आणि स्वयंपाकासाठी लागणारा वेळही वाचतो. fridge restock method

काय आहे फ्रिज रीस्टॉक मेथड?
फ्रिज रीस्टॉक मेथड म्हणजे आठवड्यातून एक दिवस फ्रिजमधील सर्व साहित्य तपासून त्याची व्यवस्थित मांडणी करणे आणि पुढील काही दिवसांसाठी लागणारे साहित्य आधीच तयार ठेवणे. यामध्ये भाज्या धुवून ठेवणे, फळे वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवणे, आवश्यक ग्रोसरी भरून ठेवणे आणि मील प्लॅननुसार साहित्य तयार ठेवले जाते.

या पद्धतीचा फायदा काय?
रोजच्या स्वयंपाकाचा वेळ कमी लागतो.
कोणती वस्तू संपली आहे हे लगेच लक्षात येते.
अन्न खराब होण्याची शक्यता कमी होते.
अनावश्यक खरेदी टाळता येते.
आठवड्याचं मील प्लॅनिंग सोपं होतं.

फ्रिज रीस्टॉक कसा करावा?
1) आठवड्यातील एक दिवस निश्चित करा.
2) फ्रिजमधील असलेल्या गोष्टींची एक्सपायरी डेट तपासा.
3) खराब झालेल्या वस्तू ताबडतोब काढून टाका.
4) भाज्या धुवून पूर्ण कोरड्या करून एअरटाइट डब्यांमध्ये ठेवा.
5) फळे वेगवेगळी साठवा.
6) दूध, दही, अंडी यांसारख्या वस्तू पुढच्या बाजूला ठेवा.
7) आठवड्याच्या मेनूनुसार आवश्यक साहित्य तयार ठेवा.

फ्रिज रीस्टॉक मेथड ही केवळ फ्रिज नीट ठेवण्याची पद्धत नाही, तर वेळ, पैसा आणि अन्नाची बचत करणारी स्मार्ट लाइफस्टाइल सवय ठरू शकते.



Comments are closed.