Gen-Z ची क्रिएटिव्हिटी दादरच्या विजयोत्सवातही दिसली, हे पोस्टर तर पाहाच…
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तरुणाईच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात सुरू झालेले हे आंदोलन अखेर 36 दिवसांनंतर यशस्वी झाले आणि प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता याच विजयाचा जल्लोष करण्यासाठी आज रविवारी (26 जुलै) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जल्लोष सभा आयोजित केली. ठाकरे बंधूंनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी ही सभा आयोजित केली होती. मात्र, या विजयोत्सवात लक्ष वेधले ते या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणलेल्या मिम्समुळे…
Comments are closed.