GK : फोटो आणि इमेज एकच? अनेकांना माहीत नाही यातील फरक
सोशल मीडियाच्या आणि डिजिटल युगात आपण दररोज फोटो आणि इमेज हे शब्द सर्रास वापरतो. अनेकदा हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात, परंतु डिजिटल तंत्रज्ञानाच्या आणि फोटोग्राफीच्या भाषेत या दोघांमध्ये मोठा फरक आहे. विशेषत AI आणि डिजिटल कंटेटचा वाढता वापर पाहता या दोघांमधील फरक हा समजून घ्यायला हवा. difference between photo and image and picture
फोटो म्हणजे काय?
वास्तविक वस्तू, व्यक्तीस किंवा स्थान अशा गोष्टी कॅप्चर केल्या जातात, ज्याला फोटो असे म्हणतात. जेव्हा एखादा फोटोग्राफर कॅमेरा किंवा मोबाईलचा सेन्सर वापरून वास्तविक जगातील दृश्य, व्यक्ती किंवा वस्तू प्रकाशाच्या मदतीने टिपतो, त्याला फोटो म्हणतात.
उदाहरणे: मोबाईलने घेतलेला सेल्फी, पासपोर्ट साईज फोटो, निसर्गाचे टिपलेले छायाचित्र किंवा लग्नातील अल्बममधील फोटो.
इमेज म्हणजे काय?
डिजिटल डिझाइन, ड्रॉइंग, ग्राफिक्स, कार्टुन, स्कॅन केलेले छायाचित्र इमेजच्या कॅटेगिरीमध्ये येतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इमेज ही कॅमेरानेच घेतली गेली असेल हे गरजेचं नसतं. ती सॉफ्टवेयर, डिझाइन टूल किंवा इतर डिजिटल माध्यमातूनही तयार केली जाऊ शकते.
उदाहरणे: डिजिटल पेंटिंग, लोगो, आलेख , 3D मॉडेल्स, कार्टून, आणि AI द्वारे तयार केलेली चित्रे.
तुम्ही तुमच्या मोबाईलने काढलेला फोटो ही तांत्रिकदृष्ट्या एक इमेजसुद्धा असते. मात्र, Photoshop मध्ये बनवलेले एखादे पोस्टर, संगणकावरील आलेख किंवा AI ने बनवलेले चित्र ही फक्त इमेज असते, त्याला आपण ‘फोटो’ म्हणू शकत नाही. त्यामुळे हे शब्द वापरताना यातील तांत्रिक फरक नक्की लक्षात ठेवायला हवा.
हेही वाचा – GK : रेल्वे स्टेशनच्या नावातील ‘टर्मिनस’, ‘जंक्शन’, ‘सेंट्रल’ आणि ‘कॅन्ट’चा अर्थ काय?
Comments are closed.