श्रावणात हे दान मानले जाते सर्वात श्रेष्ठ
सर्व महिन्यांमध्ये पवित्र मानला जाणारा श्रावण महिना शिवाच्या उपासनेसाठी आणि विविध धार्मिक कार्यांसाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. पूजापाठ करण्यासोबतच या महिन्यात दानधर्म करणे फलदायी असते, असा धार्मिक शास्त्रांत उल्लेख आहे. श्रावणात केलेले दान जन्मोजन्मीचे पुण्य प्रदान करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. परंतु, श्रावण महिन्यात नेमके कोणते दान सर्वश्रेष्ठ मानले जाते याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात. shravan daan mahatva
सर्वोत्तम देणगी –
धार्मिक ग्रंथानुसार श्रावण महिन्यात अन्नदान आणि जलदान हे सर्वात श्रेष्ठ दान सांगण्यात आले आहेत. या महिन्यात ऋतू बदलामुळे अनेक सजीवांना अन्नाची आणि पाण्याची गरज असते. अशावेळी भुकेलेल्यांना अन्न देणे आणि तहानलेल्या पाणी पाजणे यापेक्षा मोठा धर्म नाही. तसेच या महिन्यात अन्नदान केल्याने शिवपार्वतीचा आशीर्वाद मिळतो असेही मानले जाते.
इतर महत्त्वाची दाने
- महादेवाला प्रिय असलेले दुधाचे दानही तुम्ही करू शकता. यामुळे आत्मिक शांती मिळते.
- गरजूंना वस्त्रदान करता येईल. यामुळे आयुष्यातील दारिद्र्य दूर होते.
- ग्रहांची पीडा शांत करण्यासाठी आणि आरोग्य लाभासाठी तिळगूळाचे दान करणे शुभ मानले जाते.
- श्रावणात संध्याकाळी शिव मंदिरात तुपाचा दिवा दान करणे शुभ असते. यामुळे आयुष्यातील अंधकार दूर होतो.
श्रावणात कोणत्याही फळाची अपेक्षा न करता दान करायला हवे. असे म्हणतात की, श्रावण महिन्यात आपल्या ऐपतीनुसार केलेले छोटेसे दानही महादेवाच्या कृपेने अक्षय पुण्यात रुपांतरित होते. त्यामुळे या महिन्यात दान नक्की करायला हवे.
हेही वाचा – महादेवाला प्रसन्न करायचंय? मग श्रावणाआधीच घरी आणा या गोष्टी
Comments are closed.