मुंबई नटली, तिरंग्याने लखलखली
मुंबई : यंदा 15 ऑगस्ट रोजीच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध महत्वाच्या ठिकाणी आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. मंत्रालयासह विधानभवन, मुंबई महापालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीवर करण्यात आलेल्या तिरंगी रोषणाईमुळे महत्वाची सरकारी कार्यालये असलेला मुंबईतील परिसर लखलखत आहे. लाखो लोकांसाठी हा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. Independence Day 2026
छायांकन – दीपक साळवी
मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाला तिरंगी रोषणाई करण्यात आली.
दर स्वातंत्र्य दिनाला मुंबईचे खास आकर्षण ठरते ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानक.
मंत्रालयाची संपूर्ण इमरत ही तिरंगी रोषणाईने सजली होती.
विधान भवनदेखील तिरंग्याच्या रोषणाईमुळे आकर्षक वाटत होते.
Comments are closed.