स्वीमिंग केल्यानंतर मुलं आजारी का पडतात ? ही आहेत कारणे
लहान मुलांना पाण्यात खेळायला खूप आवडतं. त्यामुळे स्वीमिंग पूल मध्ये मुलं तासन् तास वेळ घालवतात. मुलं पाण्याचा आनंद घेत असल्याचे बघून पालकांनाही आनंद होतो. पण त्यानंतर मुलांना सर्दी खोकला ताप आणि त्वचेशी संबंधित त्रास सुरू होतो. त्यामुळे याचे नक्की कारण आणि उपाय जाणून घेणंही महत्वाचे आहे.
तज्ज्ञांच्या मते मुलं स्विमींग पूलमधून बाहेर आल्यावर ओल्याच कपड्यांनी, ओल्याच केसांनी एसी रुममध्ये जाऊन बसतात. त्यामुळे रक्तवाहीन्या आकुंचन पावतात. यादरम्यान ,थंडाव्यामुळे नाक आणि श्वास नलिकेच्या टिश्यूची क्षमता काहीवेळासाठी कमकुवत होते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. परिणामी मुल आजारी पडतात. पण योग्य खबरदारी घेतल्यास हा त्रास टाळता येऊ शकतो.
काय करावे?
कपडे
स्विमींग सेशन संपल्यानंतर मुलांचे ताबडतोब कपडे बदलावे. त्यानंतर सामानाची आवराआवर करावी.
केस
स्विमींग पूलमधून बाहेर आल्यावर ओले केस हवेत सुकेपर्यंत रक्तवाहीन्या आकुंचन पावतात. त्यामुळे ओल्या केस हवेत मोकळे न सोडता केसांवर स्वच्छ कोरडा टॉवेल गुंडाळावा. शक्य असेल तर ब्लो ड्रायरचा उपयोग करावा.
खाणे-पिणे
स्विमींग पूलातून बाहेर आल्यावर लगेचच मुलांना गोड पदार्थ खाण्यास देऊ नये. एनर्जी टिकवण्यासाठी मुलांना गरम पेय आणि प्रोटीनयुक्त हलके पदार्थ खाण्यास द्यावे.
Comments are closed.