स्वातंत्रदिनानंतरच्या 8 महत्त्वाच्या घडामोडी; प्रत्येकाला माहिती पाहिजेत
आपल्याला स्वातंत्र होऊन 79 वर्षे झाली असून भारत आपला 80 वा स्वातंत्रदिन शनिवारी (15 ऑगस्ट) राज्यासह देशभरात साजरा करण्यात येणार आहे. याचपार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्रदिनानंतरच्या 8 महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया… indian independence day 2026 historic facts
ब्रिटिश राजवटीतून भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 अंतर्गत 15 ऑगस्ट ही तारीख स्वातंत्र्यासाठी ‘नियुक्त दिवस’ म्हणून निश्चित करण्यात आली होती. या कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र अधिराज्य अस्तित्वात आले.
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण आपला देश लगेच प्रजासत्ताक बनला नाही, तर तो एक ‘डोमिनियन’ होता. पुढे 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाल्यानंतर भारत प्रजासत्ताक झाला. त्यामुळे स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन स्वतंत्र ऐतिहासिक घटना दर्शविण्यात आल्या आहेत.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान संविधान सभेने स्वीकारले होते. मात्र, संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले आणि याच दिवशी भारत पूर्ण प्रजासत्ताक बनला.
भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरू हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान बनले होते. मात्र 1952 रोजी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा पत्रप्रधान बनले.
भारत स्वातंत्र झाल्यानंतर अवघ्या दोनच वर्षात म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. संध्याकाळी 5.17 वाजता महात्मा गांधी रोजच्या प्रार्थना सभेसाठी जात असताना त्यांची नवी दिल्ली येथील बिर्ला हाऊस (आताचे गांधी स्मृती) येथे हत्या करण्यात आली होती.
खूप कमी लोकांना माहित आहे की, भारताचा सध्याचा राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने स्वीकारला होता, म्हणजेच स्वातंत्र्याच्या काही आठवड्यांपूर्वीच भारताच्या तिरंग्याला मान्यता मिळाली होती. तिरंग्यात केशरी, पांढरा आणि गडद हिरवा रंग आहे आणि पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.
राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात 24 आरे असतात. हे सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या ‘अॅबेकस’वर असलेल्या धर्मचक्रावरून घेतले आहे. राष्ट्रध्वजाची रुंदी आणि लांबीचे गुणोत्तर 2:3 आहे. याव्यतिरिक्त, तिरंग्याच्या डिझाइनचा आधार पिंगली व्यंकय्या यांच्या कार्याशी जोडला जातो. त्यांनी 1921 मध्ये विजयवाडा येथे गांधीजींसमोर ध्वजाचे डिझाइन सादर केले होते.
भारत स्वातंत्र झाला तेव्हाच राष्ट्रगीत बनले होते, असे अनेकांना वाटते. मात्र भारताचे महान कवी, लेखक, तत्त्वज्ञ आणि संगीतकार रवींद्रनाथ टागोर ज्यांना ‘गुरुदेव’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक दशकांपूर्वी राष्ट्रगीत लिहिले होते. परंतु प्रजासत्ताक होण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 24 जानेवारी 1950 रोजी ते अधिकृतपणे स्वीकारले गेले. तोपर्यंत स्वतंत्र भारताचे कोणतेही अधिकृत राष्ट्रगीत नव्हते.
Comments are closed.