मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात गणपती बाप्पांचे आगमन, मन सुखावणारे हे फोटो पाहिलेत का?
मुबई : मुंबईत एकीकडे शनिवारी (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना दुसरीकडे मुंबईच्या रस्त्यांवर आकर्षक गणपती बाप्पांचे दर्शन अनेकांना घडले. गणेशोस्तव 2026 अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आता मुंबईतील अनेक मंडळांनी आपला बाप्पा गणेश पंडालमध्ये घेऊन जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, 15 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यांवर ढोल ताशांचा गजर ऐकू येत आहे. वेगवेगळ्या बाप्पांचे दर्शन घेत मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पांचे स्वागत केले आहे. उंच मूर्तींची आकर्षक रूप पाहून मुंबईकरांचे डोळे सुखावले आहेत. Ganesh Idols in Mumbai
फोटो सौजन्य : दीपक साळवी
Comments are closed.