देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्ध रचला इतिहास; ‘द्रविड-पुजाराच्या क्लब’मध्ये झाला सामील
नवी दिल्ली : भारतीय फलंदाज देवदत्त पडिक्कलने गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शानदार शतक झळकावले. विशेष म्हणजे तो तिथेच थांबला नाही, तर त्याने आज (16 ऑगस्ट) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 150 धावांचा टप्पाही गाठला. या कामगिरीसह देवदत्त पडिक्कल एका क्लबमध्ये सामील झाला आहे. 86 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारून त्याने 150 धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठण्यासाठी त्याने 215 चेंडूंचा सामना केला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या या फलंदाजाने राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासोबत या खास गटात आपले स्थान निर्माण केले.
श्रीलंकेविरुद्ध 150 हून अधिक धावा करणारा देवदत्त पडिक्कल एका खास क्लबमध्ये सामील झाला आहे.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना श्रीलंकेविरुद्ध 150 हून अधिक धावा करणारा देवदत्त पडिक्कल हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
देवदत्त पडिक्कल आधी राहुल द्रविड (177 धावा, अहमदाबाद, 2009) आणि चेतेश्वर पुजारा (153 धावा, गॅले, 2017) यांनी ही कामगिरी केली होती.
देवदत्त पडिक्कलचे द्विशतक थोडक्यात हुकले आणि तो 230 चेंडूंमध्ये 167 धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने 15 चौकार आणि एक षटकार लगावला.
भारतासाठी पहिल्या कसोटीत शतकासह सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या फलंदाजांमध्ये देवदत्त पडिक्कलचा समावेश झाला आहे. पडिक्कलआधी पहिल्या क्रमाकावर करुण नायर (303*), विनोद कांबळी (224), मयंक अग्रवाल (215), दिलीप सरदेसाई (200*), बी. कुंडुरन (192), शिखर धवन (187), रोहित शर्मा (177), संदीप पाटील (174 ), यशस्वी जैस्वाल (171), व्हीव्हीएस लक्ष्मण (167) आणि देवदत्त पडिक्कल (167, आज).
Comments are closed.