Home Organization: छोटं घर मोठं दिसण्यासाठी सोपे हॅक्स
छोटं घर असलं की सामान कुठे ठेवायचं, जागा कशी मोकळी ठेवायची आणि घर अस्ताव्यस्त दिसू नये याची कायम कसरत सुरू असते. पण घराचा आकार वाढवण्यासाठी भिंत पाडण्याची गरज नाही तर फर्निचर, रंग आणि मांडणीमध्ये काही छोटे बदल केले तरी घर अधिक मोठं आणि मोकळं दिसू शकतं
1) भिंतींसाठी रंग निवड
पांढरा, क्रीम, बेज किंवा पेस्टलसारखे हलके रंग प्रकाश परावर्तित करतात. त्यामुळे खोली तुलनेने मोठी आणि मोकळी वाटते.
2) मिररचा स्मार्ट वापर
मोठा आरसा खिडकीसमोर किंवा प्रकाश येणाऱ्या जागेजवळ लावल्यास खोली अधिक खोल आणि प्रशस्त दिसू शकते. मात्र खूप आरसे लावण्याऐवजी एक मोठा आरसा निवडा.
3) जमिनीवरचं सामान
फ्लोअरवर जास्त वस्तू असतील तर खोली लहान वाटते. शक्य असल्यास भिंतीवर शेल्फ, हुक किंवा वॉल-माउंटेड स्टोरेज वापरा.
4) मल्टी-फंक्शनल वस्तू
स्टोरेज असलेला बेड, फोल्डिंग टेबल किंवा आतून सामान ठेवता येणारा सोफा छोट्या घरासाठी उपयोगी ठरतो. एकाच वस्तूचा अनेक प्रकारे वापर झाला की जागाही वाचते.
5) पडद्यांची ठेवण
खिडकीपेक्षा थोडे उंच पडदे लावून ते जमिनीपर्यंत सोडल्यास भिंती उंच दिसतात आणि खोलीला अधिक एलिगंट लूक मिळतो.
6) खिडक्या झाकू नका
खिडकीसमोर मोठं फर्निचर ठेवल्यास नैसर्गिक प्रकाश अडतो. शक्य तितकी खिडकीची जागा मोकळी ठेवा.
7) ‘कमी पण खास’ नियम
प्रत्येक कोपऱ्यात शोपीस ठेवण्याऐवजी काही निवडक वस्तू ठेवा. कमी सामान म्हणजे कमी गोंधळ आणि त्यामुळे घर अधिक मोकळं दिसतं.
छोट्या घराचं सौंदर्य त्याच्या आकारात नसून जागेचा किती स्मार्ट वापर केला जातो यात असतं. त्यामुळे महागडं इंटिरियर करण्यापूर्वी या छोट्या बदलांपासून सुरुवात करून पाहा.
Comments are closed.