5 मिनिटांत मिळवा परफेक्ट लूक; जाणून घ्या सोप्या हेअरस्टाईल्स!
रोज सकाळी ऑफिस, कॉलेज किंवा कामावर जाताना वेळ कमी असल्याने घाईघाईत साधी साधी पोनीटेल बांधतो किंवा केस तसेच मोकळे सोडतो. परंतू, दररोज एकच हेअरस्टाईल केल्यामुळे लूक देखील कंटाळवाणा वाटू लागतो आणि केसांचे सौंदर्य खुलून दिसत नाही. जर तुम्हालाही दररोज तोच तोच लूक नको असेल, तर अवघ्या 5 मिनिटांत तयार होणाऱ्या ट्रेंडी हेअरस्टाईल्स जाणून घेऊयात.
गोंधळलेला अंबाडा
कॅज्युअल आणि वेस्टर्न कपड्यांवर मेसी बन बांधू शकता. सर्व केस एकत्र करून डोक्यावर थोडे वरच्या बाजूला गुंडाळा आणि रबर बँड किंवा क्लच लावा. पुढे काही बटा मोकळ्या सोडल्यास चेहरा अधिक आकर्षक दिसेल.
अर्धा वर अर्धा खाली
जर तुम्हाला केस पूर्णपणे मोकळे ठेवणे आवडत असेल, तर कानाच्या वरचे थोडे केस एकत्र करून मिनी क्लचने बांधा आणि उर्वरित केस मोकळे ठेवा. कुर्त्यांवर किंवा वन-पीसवर ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते.
उंच पोनीटेल
ऑफिससाठी हाय पोनीटेल हा सर्वोत्तम पर्याय आहे. केस नीट विंचरून डोक्याच्या वरच्या बाजूला घट्ट रबरने बांधा. तुम्ही या हेअरस्टाईलसाठी सिरम सुद्धा वापरू शकता. ज्यामुळे दिवसभर केस सेट राहतील.
फ्रेंच वेणी
नेहमीच्या साध्या वेणीऐवजी फ्रेंच वेणी नक्की ट्राय करा. ही हेअरस्टाईल संपूर्ण दिवस टिकून राहते आणि यामुळे केस गुंतत नाहीत.
दररोज या वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स ट्राय करून तुम्ही रोजचा एकच लूक सहज बदलू शकता.
हेही वाचा – सिल्की केस हवेत? ट्राय करा कोरियन हेअर केअर
Comments are closed.