चहा-कॉफी पुन्हा पुन्हा गरम करून पिता? आधी हे जाणून घ्या
सकाळचा चहा राहून गेला, ऑफिसमध्ये कॉफी थंड झाली किंवा पाहुणे निघून गेल्यानंतर जास्तीची चहा कॉफी उरली अशावेळी ते फेकून देण्याऐवजी पुन्हा गरम करून पिण्याची सवय अनेकांची असते. पण चहा-कॉफी वारंवार गरम केल्याने चव, सुगंध आणि पेयाची गुणवत्ता बदलू शकते. विशेषतः दूध घातलेले पेय बराच वेळ बाहेर ठेवून पुन्हा पुन्हा गरम करणे टाळणे चांगलं.
चहा पुन्हा गरम केल्याने काय होतं?
चहा बनवल्यानंतर तो बराच वेळ ठेवला आणि नंतर पुन्हा उकळला, तर त्याची चव कडवट किंवा जास्त तीव्र वाटू शकते. त्यातील सुगंधी घटकही कमी होतात. त्यामुळे ताजा चहा बनवून शक्य तितक्या लवकर पिणे अधिक चांगले.
कॉफीचं काय?
कॉफी पुन्हा गरम केल्याने तिचा फ्लेवर बदलू शकतो आणि कडवटपणा जाणवू शकतो. विशेषतः आधीच तयार करून बराच वेळ ठेवलेली कॉफी पुन्हा पुन्हा गरम करण्यापेक्षा गरजेपुरतीच कॉफी बनवणे अधिक चांगली सवय आहे.
दूध असलेला चहा-कॉफी
ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दूध घातलेले पेय खोलीच्या तापमानावर बराच वेळ पडून राहिल्यानंतर फक्त गरम करून पुन्हा पिणे सुरक्षित असेलच असे नाही.
वारंवार उकळल्यामुळे त्यातील पौष्टिक घटक नष्ट होतात, चव बिघडते आणि हानिकारक बॅक्टेरिया वाढतात. यामुळे ऍसिडिटी, पोटात जळजळ आणि पचनाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
मग काय करावं?
एकावेळी गरजेपुरताच चहा किंवा कॉफी बनवा.
उरलेलं पेय वारंवार उकळण्याऐवजी शक्य असल्यास टाळा.
दूध असलेले पेय बराच वेळ बाहेर ठेवू नका.
ताज्या पेयाला प्राधान्य द्या.
पेयाचा वास, चव किंवा पोत बदलला असेल तर ते पिऊ नका.
चहा-कॉफी पुन्हा गरम करणं म्हणजे प्रत्येक वेळी ते विषारी होतं, असं नाही. मात्र वारंवार गरम केल्याने गुणवत्ता आणि चव कमी होऊ शकते, तर दूध असलेले पेय चुकीच्या पद्धतीने साठवल्यास त्याचे चुकीचे परिणाम होऊ शकतात.
Comments are closed.