Men Grooming Tips: ऑफिसला जाणाऱ्या पुरुषांनी टाळाव्यात ‘या’ ग्रूमिंग चुका
ऑफिसमध्ये प्रोफेशनल दिसण्यासाठी महागडे कपडे किंवा सतत बदलणारा फॅशन ट्रेंड गरजेचा नाही. स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि काही बेसिक ग्रूमिंग सवयी तुमच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा फरक पाडतात. मात्र रोजच्या धावपळीत काही छोट्या चुका नकळत होतात आणि त्यामुळे पूर्ण लूक विस्कटलेला दिसू शकतो.
ऑफिसला जाताना पुरुषांनी ‘या’ गोष्टी लक्षात घ्यावा:
1) केसांची स्टायलिंग
केस कितीही स्टायलिश असले तरी ते तेलकट, विस्कटलेले किंवा अस्वच्छ दिसत असतील तर लूक खराब होतो. ऑफिसला जाण्यापूर्वी केस नीट सेट करा आणि नियमित हेअरकट ठेवा.
2) अव्यवस्थित दाढी
दाढी ठेवणं चुकीचं नाही; पण तिची लांबी आणि आकार व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे. गळ्याजवळ किंवा गालांवर खूप वाढलेले केस लूक अस्ताव्यस्त करू शकतात.
3) अतिपरम्युमचा वापर
ऑफिसमध्ये तीव्र सुगंधापेक्षा सौम्य फ्रेगरन्स अधिक योग्य ठरतो. परफ्यूमचा उद्देश तुमच्या आसपासच्या प्रत्येकाला सुगंध जाणवणे नाही.
4) अस्वच्छ नखे
लांब किंवा अस्वच्छ नखे तुमच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर परिणाम करू शकतात. नखे नियमित कापून स्वच्छ ठेवा.
5) दातांची स्वच्छता
ब्रश केल्यानंतरही तोंडाचा वास जाणवत असेल तर ओरल हायजिनकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ऑफिसमध्ये जवळून बोलताना ही गोष्ट विशेष महत्त्वाची ठरते.
6) कपड्यांची तपासणी
महागडा शर्ट घातला तरी तो खूप सैल किंवा खूप घट्ट असेल तर लूक बिघडतो. स्वच्छ, इस्त्री केलेले आणि योग्य फिटिंगचे कपडे अधिक प्रोफेशनल दिसतात.
7) फूटवेअर चेक
धूळ लागलेले शूज किंवा अस्वच्छ मोजे संपूर्ण लूकवर परिणाम करतात. त्यामुळे रात्री ते स्वच्छ करा मगच घाला कारण ऑफिससाठी शूज स्वच्छ आणि मोजे फ्रेश ठेवणे योग्य.
ग्रूमिंग म्हणजे स्वतःला बदलणं नाही रोजच्या रुटीनमध्ये या छोट्या गोष्टींची सवय लावली तर साध्या कपड्यांमध्येही तुमचा ऑफिस लूक अधिक स्मार्ट दिसू शकतो.
Comments are closed.