सुपरमार्केटमध्ये खरेदी करताना होणारा अनावश्यक खर्च कसा टाळावा?
महिन्याचा किराणा भरण्यासाठी सुपरमार्केटमध्ये जाणे ही अनेकांची सवय आहे. येथे एकाच छताखाली सर्व वस्तू मिळत असल्या तरी बऱ्याचदा आपण आवश्यक नसलेल्या वस्तू खरेदी करतो आणि बजेट कोलमडते. सुपरमार्केटमधील आकर्षक ऑफर्स जास्त खरेदी करण्यास प्रवृत्त करतात. पण काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही हा नाहक खर्च सहज टाळू शकता.
खरेदीची यादी बनवा –
घरातून निघण्यापूर्वी आपल्याला कशाची गरज आहे, याची यादी तयार करा आणि केवळ त्याच वस्तू खरेदी करण्यावर भर द्या.
रिकाम्या पोटी जाऊ नका –
उपाशी पोटी सुपरमार्केटमध्ये गेल्यास जंक फूड, स्नॅक्स आणि चॉकलेट्स जास्त खरेदी केले जातात. त्यामुळे नेहमी पोटभर जेवून किंवा नाश्ता करूनच खरेदीला जावे.
बास्केटचा वापर करा-
कमी वस्तू घ्यायच्या असतील तर मोठी ट्रॉली घेण्याऐवजी बास्केट वापरा. मोठी ट्रॉली रिकामी दिसल्यास ती भरण्याची मानवी सवय असते.
बाय 1 गेट 1 नको –
गरज नसताना केवळ ऑफर आहे म्हणून वस्तू खरेदी करणे थांबवा. त्यामुळे बाय 1 गेट 1 ची ऑफर टाळावी.
शेल्फ्सच्या खाली-वर पहा –
सुपरमार्केटमध्ये महागड्या वस्तू सहसा डोळ्यांच्या थेट रेषेत ठेवल्या जातात तर स्वस्त वस्तू खाली किंवा वरील शेल्फवर असतात.
बिलिंग काउंटरजवळील वस्तूंपासून लांब राहा –
बिलिंगच्या रांगेत उभे असताना काउंटरजवळ ठेवलेली चॉकलेट्स, बिस्किटे किंवा छोटी गॅझेट्स सहजासहजी विकत घेतली जातात. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवावे.
हेही वाचा – कपल्समध्ये का वाढतोय फूड डिवोर्स ट्रेंड?
Comments are closed.