दिवसातून किती कप आणि कोणत्या वेळी चहा प्यावा, जाणून घ्या




दिवसातून किती कप आणि कोणत्या वेळी चहा प्यावा


चहा हा अनेकांच्या दिवसाचा अविभाज्य भाग आहे. सकाळी उठल्यावर चहाचा कप मिळाला की दिवसाची सुरुवात छान झाल्यासारखी वाटते. कामाच्या धावपळीत दुपारी आणि संध्याकाळीही चहा हवाच असतो. मात्र चहा किती प्यावा यासोबतच तो कोणत्या वेळी प्यावा, याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. चुकीच्या वेळी किंवा जास्त प्रमाणात चहा घेतल्यास झोप आणि पचनावर परिणाम होऊ शकतो.

किती चहा प्यावा ?
निरोगी व्यक्तीने दिवसातून साधारण 2 ते 3 कप चहा घेणं योग्य मानलं जातं. एकूण प्रमाण साधारण 250 ते 300 मिलीपर्यंत ठेवणं चांगलं. दिवसभरात वारंवार चहा पिण्याची सवय असल्यास हे प्रमाण लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

सकाळी कधी प्यावा?
सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा पिणं टाळा. त्याऐवजी नाश्ता केल्यानंतर किंवा काही हलकं खाल्ल्यानंतर चहा घेतल्यास अधिक योग्य ठरतं. त्यामुळे चहाची सवयही राहते आणि पोटावर अनावश्यक ताणही येत नाही.

दुपारची योग्य वेळ
दुपारच्या जेवणानंतर लगेच चहा घेण्याऐवजी साधारण 1 ते 2 तासांचं अंतर ठेवणं चांगलं.

संध्याकाळचा शेवटचा कप
संध्याकाळचा चहा अनेकांना आवडतो, पण तो खूप उशिरा घेणं टाळा. शक्यतो संध्याकाळी 6 वाजण्यापूर्वी शेवटचा चहा घ्यावा. विशेषतः चहामुळे झोप उशिरा येत असेल तर ही वेळ आणखी योग्य ठरते.

चहा ताजा असणं महत्त्वाचं
चहा बनवल्यानंतर शक्यतो तो ताजाच प्यावा. विशेषतः दुधाचा चहा बराच वेळ ठेवून पुन्हा गरम करून पिणं टाळा. चहा बनवून ठेवण्यापेक्षा गरजेनुसार ताजा चहा बनवण्याची सवय अधिक चांगली.



Comments are closed.