Hair Oiling: आठवड्यातून किती वेळा केसांना तेल लावावं?




आठवड्यातून किती वेळा केसांना तेल लावावं?


केसांना तेल लावणं ही अनेकांच्या हेअर केअर रुटीनमधील आवडती सवय आहे. पण आठवड्यातून किती वेळा तेल लावावं, किती वेळ ठेवावं आणि कोणतं तेल वापरावं याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. प्रत्येकाच्या केसांचा प्रकार आणि स्काल्प वेगळा असल्याने सगळ्यांसाठी एकच नियम योग्य ठरत नाही. त्यामुळे आपल्या केसांची गरज ओळखून तेल लावणं अधिक महत्वाचं आहे.

कोरडे / रफ केस
केस सतत कोरडे, रफ किंवा गुंतणारे असतील तर आठवड्यातून 2 वेळा हलक्या हाताने तेल लावू शकता. नारळ तेल किंवा बदाम तेलाचा पर्याय चांगला आहे. तेल लावताना केसांच्या लांबीवरही लक्ष द्या.

तेलकट टाळू
स्काल्प आधीपासूनच तेलकट असेल तर वारंवार तेल लावणं टाळा. आठवड्यातून एकदा हलकं तेल लावणं पुरेसं ठरू शकतं. तेल जास्त वेळ डोक्यावर ठेवण्यापेक्षा काही तासांनी केस धुणं योग्य.

सामान्य केस
केस ना खूप कोरडे ना खूप तेलकट असतील तर आठवड्यातून 1 ते 2 वेळा तेल लावण्याची सवय ठेवू शकता. नारळ तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल यापैकी केसांना जे सूट होतं ते निवडा.

कुरळे / फ्रिझी केस
कुरळ्या केसांमध्ये कोरडेपणा आणि फ्रिझ अधिक जाणवू शकतो. त्यामुळे आठवड्यातून 1 ते 2 वेळा तेल लावून केसांना मॉइश्चर देण्याचा प्रयत्न करता येतो. केसांचा पोत लक्षात घेऊन तेलाचं प्रमाण ठरवा.

तेल लावताना ही काळजी घ्या
तेल लावताना जोरात स्काल्प चोळण्याऐवजी बोटांच्या टोकांनी हलका मसाज करा. खूप जास्त तेल लावल्याने अधिक फायदा होतोच असं नाही. तेल लावल्यानंतर केस स्वच्छ धुणंही महत्त्वाचं आहे. एखाद्या तेलामुळे खाज, लालसरपणा किंवा त्रास जाणवत असेल तर त्याचा वापर थांबवून तज्ज्ञांचा सल्ला घ्या.



Comments are closed.