टाईल्सच्या लाईनमध्ये साचलेली घाण कशी स्वच्छ कराल?




गलिच्छ भिंत फरशा साफ करणे


घराची नियमित साफसफाई करूनही अनेकदा फर्शीच्या किंवा भिंतीच्या टाईल्समधील भेगा काळ्या पडतात. यामध्ये धुळ, पाणी आणि बुरशी साचल्याने बाथरूम, घर अस्वच्छ दिसू लागते. अशावेळी तुम्ही घरातील सोप्या घटकांचा वापर करून या लाईन्स अगदी नव्यासारख्या चमकवू शकता.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करावी. ही पेस्ट टाईल्सच्या काळ्या पडलेल्या लाईन्सवर लावावी. त्यावर स्प्रे बॉटलने पांढरा व्हिनेगर शिंपडावे. यामुळे फेस तयार होईल. 10 मिनिटांनंतर जुन्या टूथब्रशने हलक्या हाताने घासून कोमट पाण्याने धुवावी.

लिंबाचा रस आणि मीठ

लिंबामधील नैसर्गिक ॲसिड आणि मिठाचा खरखरीतपणा हट्टी डाग काढण्यास बेस्ट असतो. लिंबाच्या रसात थोडे मीठ मिसळून लाईन्सवर लावावे. 15 मिनिटांनंतर ब्रशने घासून स्वच्छ करा. यामुळे घाण निघून जाईल.

हायड्रोजन पेरॉक्साइड

जर डाग खूप जुने असतील तर बेकिंग सोड्यात हायड्रोजन पेरॉक्साइड मिसळून लावावे आणि 15 मिनिटांनंतर धुवून घ्या, बुरशी पूर्णपणे नष्ट होईल.

महत्त्वाची टीप –

टाईल्स स्वच्छ केल्यानंतर नेहमी कोरड्या सुती कपड्याने पुसून घ्याव्यात. ओलावा राहिल्यास पुन्हा घाण साचण्याची शक्यता अधिक असते. आठवड्यातून एकदा डिटर्जंटच्या पाण्याने टाईल्स पुसल्यास त्या दीर्घकाळ स्वच्छ राहतात.

हेही वाचा – कपडे रोज इस्त्री करणाऱ्यांसाठी कोणती आयरन बेस्ट?



Comments are closed.