महिलांसाठी बजेटफ्रेंडली अन् वॉटरप्रूफ फूटवेअर पर्याय

पावसाळ्यात रस्ते चिखलमय आणि निसरडे होतात. अशा वेळी घसरून पडू नये, यासह पावसाळ्यातही स्टायलिश दिसण्यासाठी योग्य फूटवेअर निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. आज आम्ही तुम्हाला महिलांसाठी 5 सर्वोत्तम फूटवेअर पर्याय सांगणार आहोत.

पावसाळ्यात वापरण्यासाठी क्रॉक्स आणि क्लॉग्स सर्वात आरामदायी असतात. हे वॉटरप्रूफ आणि वजनाने हलके असतात. ज्यामुळे स्वच्छ करणेही सोपे जाते.
ऑफिस किंवा कॉलेजला जाणाऱ्या महिलांसाठी रबर किंवा सिलिकॉन बेलिज हा एक क्लासिक लुक देणारा पर्याय आहे. रबर किंवा पीव्हीसी मटेरियलच्या बेलिज पाण्यामुळे खराब होत नाहीत.
जास्त चालणे असल्यास किंवा ट्रॅव्हलिंगसाठी फ्लोटर्स उत्तम ठरतात. यांची ग्रीप मजबूत असल्याने निसरड्या रस्त्यांवरून घसरत नाहीत.
कॅज्युअल आऊटिंग किंवा वेस्टर्न आऊटफिट्सवर ग्लॅडिएटर्स आणि स्ट्रॅपी रबर सँडल्स स्टायलिश दिसतात. स्ट्रॅप्समुळे पायांना चांगली पकड मिळते आणि पाणी सँडलमध्ये साचून राहत नाही.
मुसळधार पावसात किंवा तुंबलेल्या पाण्यातून जाण्यासाठी गमबूट्स बेस्ट आहेत. हे पायांना पूर्णपणे कोरडे ठेवतात आणि पायाला चिखलही लागत नाही.

हेही वाचा – पुरुषांच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत हे Must-Have कपडे

Comments are closed.