या व्यक्तींशी कधीच करू नये शत्रुत्व





आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील एक महान रणनीतीकार, अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि थोर विचारवंत होते. चाणक्य यांच्या निती आजही लोकप्रिय असून दैनंदिन जीवनात देखील या निती मार्गदर्शकाचे काम करतात. यामुळे चाणक्यनितीप्रमाणे आपण आचरण केल्यास आयुष्य शांततेत जगणे सहज शक्य आहे. त्यातही जर तुम्हाला कोण तुमचे मित्र आहेत आणि कोण शत्रू हे ओळखता येत असेल तर अनेक प्रश्न सुटतात. तर काहीवेळा आपण नको त्या व्यक्तींशी शत्रुत्व करतो आणि आपले कसे नुकसान होते ते बघूया.

१- अग्नी, सर्प, राजा आणि मूर्ख व्यक्ती

चाणक्यनितीनुसार राजा म्हणजे ज्याच्या हातात राज्य कारभार, प्रशासन चालवण्याची शक्ती आहे तो,त्यानंतर विषारी साप आणि मूर्ख व्यक्तींशी कधीही शत्रुत्व घेऊ नये. तसेच या व्यक्तींपासून कधीही बेसावध राहू नये. कारण या व्यक्ती कधीही तुमचा विनाश करू शकतात.

२-तुमची गुपित जाणणारे मित्र, नातेवाईक

चाणक्यनितीनुसार ज्या व्यक्तींना तुमच्याबदद्ल बरीच माहीती असेल अशा व्यक्तींबरोबर थेट शत्रुत्व घेणे टाळावे. कारण अशा व्यक्ती विषासारख्या असतात. तुमच्या माहीतीवरून त्या तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याशी सरळ शत्रुत्व न घेता अंतर ठेवावे.

३-ज्ञानी, वैद्य आणि शस्त्रधारी
चाणक्यनितीनुसार कधीही ज्ञानी, वैद्य आणि शस्त्रधारी व्यक्तआंबरोबर शत्रुत्व घेऊ नये. कारण जर
जर वैदय किंवा डॉक्टर असलेल्या व्यक्तीला तुमच्या आरोग्याचे गुपित माहीत असेल आणि तुमचे त्याच्याशी मतभेद झाले तर तुमच्यात विश्वासाचा प्रश्न उभा राहू शकतो. तसेच जर तुम्ही वैद्य किंवा डॉक्टर व्यक्तींबरोबर शत्रुत्व घेतले तर भविष्यात तुम्हाला जर त्याची गरज असेल तरी तुम्ही त्याकडे जाऊ शकणार नाही. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

४-बुद्दीवान-तसेच जर तुम्ही बुद्दीवान व्यक्तीबरोबर शत्रुत्व घेतले तर तो तुम्हाला चार चांगल्या गोष्टी सांगमही बंद करेल. त्यामुळे या व्यक्तींशी कधीही शत्रुत्व घेऊ नये.



Comments are closed.