कॅफे डेटचा प्लॅन पण बजेट कमी? मुंबईतील हे 5 Budget Friendly Cafes पाहाच
मुंबईत मित्रमैत्रिणींसोबत भेटायचं म्हटलं की प्लॅन पटकन होतो, पण साधं हॉटेल मध्ये जरी जायचं झालं तरी बिल किती येईल याचा विचार केला की अनेकदा प्लॅनच कॅन्सल होतो. कॉलेजमधले मित्र असोत, ऑफिसनंतरचा छोटासा प्लॅन असो किंवा फॅमिलीसोबत निवांत गप्पा मारायच्या असोत, कॅफेमध्ये बसून काहीतरी खाण्याची आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्याची मजा वेगळीच असते. मात्र त्यासाठी प्रत्येक वेळी मोठं बजेट असण्याची गरज नाही. मुंबईत अशी अनेक कॅफे आहेत जिथे चांगलं खाणं, आरामदायी वातावरण आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याचा आनंद अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा बजेटमध्ये घेता येतो.
1) बीन कॉफी, चेंबूर
चेंबूरमधील Bean Kaffee हा अतिशय बजेट फ्रेंडली पर्याय. कॉफी आणि कॅफे स्नॅक्ससाठी ओळखलं जाणारं हे छोटं ठिकाण आहे.कॉलेज फ्रेंड्ससोबत भेटून गप्पा मारायच्या असतील किंवा छोटासा कॉफी ब्रेक घ्यायचा असेल तर हे ठिकाण लक्षात ठेवता येईल.
२) बॉम्बे कॉफी हाऊस, काळा घोडा
काला घोड्याच्या परिसरात फिरायला गेल्यावर स्वस्तात काही खायचं असेल तर Coffee House हा पर्याय बेस्ट आहे. कॉफी, चहा आणि South Indian पदार्थांसाठी हे ठिकाण ओळखले जाते. कॉलेज ग्रुपसोबत फिरताना बजेटमध्ये ब्रेक घ्यायचा असेल तर हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.
3) बीट हाऊस कॅफे, मरीन लाईन्स
मरीन लाइन्समध्ये मित्रांसोबत भेटण्याचा प्लॅन असेल तर Beat House Cafe विचारात घेता येईल. येथे कॉफी, चहा आणि कॅफे स्नॅक्ससह विविध पर्याय मिळतात.
4) Kuckeliku Breakfast House, कुलाबा
फॅमिलीसोबत सकाळचा नाश्ता किंवा दिवसभरात हलकं काही खाण्याचा प्लॅन असेल तर कुलाब्यातील Kuckeliku Breakfast House हा पर्याय पाहता येईल. ऑल डे ब्रेकफास्ट ही याची खासियत असून, कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठीही हे ठिकाण योग्य वाटू शकते.
५) द बॅकयार्ड ब्रू, वर्सोवा
अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा परिसरात असणाऱ्यांसाठी The Backyard Brew हा मित्रांसोबत भेटण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कॉफी, कॅफे फूड आणि आरामदायी वातावरणासाठी हे ठिकाण ओळखले जाते.
पुढच्या वेळी मित्रांसोबत अचानक भेटण्याचा प्लॅन झाला किंवा फॅमिलीला बाहेर घेऊन जायचं असेल, तर खिशाला परवडणाऱ्या या पर्यायांचा विचार नक्की करा. मात्र मेन्यूच्या किमती, उपलब्धता आणि वेळा बदलू शकतात, त्यामुळे जाण्यापूर्वी कॅफेशी माहिती तपासून घेणे योग्य ठरेल.
Comments are closed.