Milk Boiling Tricks: सारखं दूध उतू जातं? वापरा या सोप्या ट्रिक्स
दूध गरम करताना दोन मिनिटांसाठी जरी दुसरीकडे लक्ष गेलं, तरी गॅसवर दूध उतू जाण्याची शक्यता असते. उकळताना दूध भांड्याबाहेर सांडलं की गॅसचा ओटा खराब होतो आणि साफसफाईची कटकटही वाढते. त्यामुळे आजीच्या काळापासून वापरल्या जाणाऱ्या काही छोट्या ट्रिक्स आजही अनेकांच्या स्वयंपाकघरात उपयोगी ठरतात त्या जाणून घेऊयात.
1) लाकडी चमच्याचा वापर
दूध गरम करण्यासाठी भांडं गॅसवर ठेवल्यानंतर त्याच्या वर आडवा लाकडी चमचा किंवा लाकडी लाटणे ठेवा. दूध वर येताना तयार होणारा फेस काही प्रमाणात फुटण्यास मदत होते आणि दूध लगेच उतू जाण्याचा धोका कमी होऊ शकतो.
2) भांड्याला तूप लावणे
दूध गरम करण्यापूर्वी भांड्याच्या आतील कडेवर अगदी थोडं तूप लावण्याची पद्धतही काही घरांमध्ये वापरली जाते. यामुळे दूध वर येण्याचा वेग काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. तूप जास्त लावण्याची गरज नाही.
3) गॅसची आच
दूध मोठ्या आचेवर पटकन गरम करण्याऐवजी मध्यम किंवा मंद आचेवर गरम करा. दूध उकळीच्या जवळ आलं की आच कमी करा आणि अधूनमधून ढवळत राहा. यामुळे दूध तळाला लागण्याची शक्यताही कमी होते.
4) रुंद तोंडाचे भांडे
दूध गरम करण्यासाठी नेहमी रुंद तोंडाचे आणि जाड बुडाचे भांडे वापरावे, ज्यामुळे उष्णता समान लागते आणि फेस पसरण्यास जागा मिळते.
दूध गरम करताना भांडं पूर्ण भरू नका. वर थोडी जागा ठेवल्यामुळे उकळी आल्यावर दूध बाहेर सांडण्याची शक्यता कमी होते.
Comments are closed.