जुन्या भरजरी साड्यांपासून बनवा आकर्षक हेडबोर्ड
जुन्या साडीचा वापर करून सुंदर आणि हटके हेडबोर्ड तयार करता येतो. यामुळे बेडरूमला पारंपरिक, आकर्षक आणि रॉयल लूक मिळतो. पण हा हेडबोर्ड कसा बनवायचा ते बघूया.
जाड प्लायवुड किंवा MDF बोर्ड हेडबोर्डच्या आकारात कापून घ्यावा.
त्यावर फोम/कॉटनची पॅडिंग लावावी, जेणेकरून हेडबोर्ड मऊ आणि आरामदायी होईल.
आवडणारी जुनी साडी नीट इस्त्री करून फोमवर ताणून बसवावा.
साडीचा कपडा बोर्डच्या मागील बाजूस स्टेपल गनने घट्ट फिक्स करावा.
साडीवर सुंदर बॉर्डर असल्यास ती हेडबोर्डच्या कडेला ठेवावी—यामुळे डिझाइन अधिक उठून दिसेल.
शेवटी हेडबोर्ड भिंतीला किंवा बेडच्या फ्रेमला व्यवस्थित बसवावा.
जर जुन्या बनारसी, पैठणी, कांजीवरम किंवा जरी बॉर्डरच्या जुन्या साडीपासून हेडबोर्ड बनवत असाल तर साध्या बेडरूमलाही रॉयल आणि एलिगंट लूक मिळू शकतो.
Comments are closed.