धनादेशाच्या रकमेपूर्वी 'फक्त' लिहिणे?
बँकेचा चेक भरताना आपण नेहमी एका गोष्टीची विशेष काळजी घेतो, ती म्हणजे अक्षरी रक्कम लिहिल्यानंतर शेवटी Only हा शब्द नक्कीलिहितो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की बँकेच्या चेकवर हा शब्द लिहिणं इतकं का महत्त्वाचं मानलं जातं? यामागे कोणताही नियम नसून आर्थिक फसवणूक टाळण्यासाठीचं एक महत्त्वाचं कारण आहे. जाणून घेऊयात याविषयी सविस्तरपणे why write only on cheque
आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी
चेकवर अक्षरी रकमेनंतर Only लिहिण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे चेक मधील रकमेत कोणीही फेरफार होऊ नये. कारण एखाद्या विशिष्ट रकमेनंतर तुम्ही Only लिहिल्यावर त्या वाक्याचा तिथेच शेवट होतो आणि पुढे नवीन शब्द जोडण्यास जागा राहत नाही.
आकडेवारीतील फेरफार टाळणे
अक्षरी रकमेप्रमाणेच जेव्हा आपण अंकात रक्कम लिहितो उदा. रु.20000/- तेव्हा शेवटी /- Dash ही खूण करतो. या खुणेमुळे 20000च्या पुढे अतिरिक्त शून्य लावून रक्कम वाढवता येत नाही.
बँक कर्मचाऱ्यांसाठी कामाचे
बँकेत जेव्हा चेक क्लिअरन्ससाठी जातो, तेव्हा बँक अधिकारी अंकी आणि अक्षरी दोन्ही रकमा तपासून पाहतात. रकमेच्या शेवटी Only असल्यामुळे बँक अधिकाऱ्याला हीच रक्कम आहे याची खात्री पटते आणि चेक पास प्रक्रियेत कोणतीही अडचण येत नाही.
चेक भरताना या गोष्टी लक्षात ठेवा
- शब्दांमध्ये जास्त जागा सोडू नये, जेणेकरून त्यामध्ये कोणीही त्यात शब्द लिहू शकणार नाही.
- बॉलपेनचाच वापर करावा, जेल पेननं लिहू नये.
- अकाउंटला पैसे जमा करायचे असल्यास चेकच्या कोपऱ्यात दोन तिरप्या रेषा मारून A/C Payee लिहावं.
हेही वाचा – कॅफे डेटचा प्लॅन पण बजेट कमी? मुंबईतील हे 5 Budget Friendly Cafes पाहाच
Comments are closed.