जिममध्ये एक्सरसाइज करताना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण का वाढतंय?
हल्ली फिट राहण्यासाठी जिममध्ये जाऊन वर्कआउट करण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत जिममध्ये एक्सरसाईज करताना हार्ट अटॅक आल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अगदी विशीत-तिशीतील तरूणांनाही हार्ट अटॅक येत आहेत. यामागे नक्की कोणती कारणं आहेत आणि वर्कआउट करताना कोणती काळजी घेतली पाहिजे जाणून घेऊयात सविस्तरपणे
हार्ट अटॅक येण्याची कारणे
- क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणं किंवा खूप जास्त एक्सरसाईज केल्यानं हृदयावर मोठा ताण पडतो.
- अनेकदा व्यक्तीला स्वतःला हाय बीपी, ब्लॉकेजेस किंवा हृदयाशी संबंधित त्रास असल्याचे माहीत नसते. अशा वेळी हेवी एक्सरसाईज करणं धोकादायक ठरतं.
- स्मोकिंग, ड्रिकिंग, अपुरी झोप, स्ट्रेस आणि जंक फूडमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात.
- तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइड्ससारखे सप्लीमेंट्स घेणं हृदयासाठी घातक ठरतात.
एक्सरसाईज करताना काय लक्षात घ्याल?
- जिम सुरू करण्यापूर्वी हेल्थ चेकअप आणि गरज असल्यास ईसीजी करून घ्यावं.
- एक्सरसाईज करताना नेहमी वॉर्म-अप करावा आणि हळूहळू तीव्रता वाढवावी.
- एक्सरसाईज करताना चक्कर येणं, छातीत कळ येणं, अतिप्रमाणात घाम येणं किंवा दम लागणं असा त्रास झाल्यास वर्कआउट लगेचच थांबवावा.
हेही वाचा – दोनच पोळ्या खाता, तरीही वजन वाढतयं? असू शकतं हे कारण
Comments are closed.