दूध, दहीच नाही तर या पदार्थातूनही मिळतं कॅल्शियम





दूध, दही, पनीर यासारख्या दुग्धजन्य पदार्थातून कॅल्शियम मिळतं हे आपल्याला माहीत आहे. पण ज्यांना दूध किंवा दुधापासून तयार होणाऱे पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या समस्या उद्भवतात. अशावेळी किचनमधील कोणत्या पदार्थांमधून कॅल्शियम मिळते ते बघूया.

नाचणी
नाचणी हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असून यापासून तुम्ही विविध पदार्थ बनवू शकता. नाचणीपासून आपण नाचणीची भाकर,चीला, डोसा, दलिया आणि खिचडी बनवू शकतो. जर तुम्हाला दररोज नाचणी खाणे पसंत असेल तर अशा वेगळ्या डिशेस तुम्ही बनवू शकता.

टोफू-सोया दूध

जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर टोफू आणि सोया मिल्क हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. टोफू ची भाजी, भुर्जी किंवा सॅलड तुम्ही खावू शकता. दूधाच्या जागी सोया मिल्क तुम्ही घेऊ शकता. या दोन्ही पदार्थांतून तुम्ही कॅल्शियमची कमतरता दूर करू शकता.

बदाम-मासे
बदाममध्ये देखील मुबलक कॅल्शियम असते. नाश्ता करताना तुम्ही बदाम खावू शकता. जर तुम्ही मासे खात असाल तर त्यातूनही तुम्हाला कॅल्शियम मिळते.

व्हिटॅमिन डी
हाडांबरोबरच स्नायूंच्या मजबुतीसाठी कॅल्शियमबरोबर व्हिटामी डीची शरीराला गरज असते. डॉक्टर त्य़ासाठी व्हिटामीन डीच्या गोळ्या सुचवतात.



Comments are closed.