सीएसएमटी ते सावंतवाडीपर्यंत धावणाऱ्या विशेष रेल्वेचा शुभारंभ
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सावंतवाडीपर्यंत जाणाऱ्या विशेष रेल्वे सेवेचा आज (03 सप्टेंबर) शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मत्स्यविकास मंत्री नितेश राणे, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विशेष रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून ही गाडी कोकणात रवाना केली. याप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.
गाडी क्रमांक 01001 सीएसएमटी – सावंतवाडी रोड दैनंदिन एक्स्प्रेसचा शुभारंभ सोहळा सीएसएमटी स्थानकात पार पडला असून ही गाडी अंदाजे 510 किमी अंतर पार करणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मत्स्यविकास मंत्री नितेश राणे, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सीएसएमटी ते सावंतवाडी रोड या विशेष रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला.
याप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान धावणारी ही विशेष रेल्वे दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, मानगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नंदगांव रोड, कंकावली, सिंधुदुर्ग आणि कुडाल या स्थानकांवर थांबा घेणार आहे.
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड या विशेष रेल्वे सेवेचा आज शुभारंभ झाल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Comments are closed.