दहीहंडीच्या उत्सवात मुख्यमंत्री फडणवीसांचा नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश, पहा फोटोस
मुंबई : राज्यात विविध जिल्ह्यांत दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (5 सप्टेंबर) वरळी येथे राजयोग प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सव 2026 मध्ये नशामुक्त महाराष्ट्र, निरोगी महाराष्ट्र या महत्त्वपूर्ण संकल्पनेचा प्रसार केला. याच थीमवर हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी, हजारो गोविंदांनी हजेरी लावली होती. CM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वरळी येथे ‘नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र’ या थीमवर साजरा करण्यात आला.
उपस्थित गोविंदांमध्ये या संकल्पनेचा प्रचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
यावेळी, वरळी येथील विविध दहीहंडी उत्सवांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि गोविंदांशी संवाद साधत उत्साह वाढवला.
दहीहंडी थर रचताना सुरक्षितता राखण्याचे आवाहन करत राज्य सरकारकडून गोविंदांसाठी 10 लाखांचे विमा सुरक्षा कवच जाहीर करण्यात आले.
Comments are closed.